Press "Enter" to skip to content

मोहोपाडा प्रवेशव्दारा जवळील रस्त्याची समस्या सुटली

रसायनी वाहतूक पोलीस शिपाई संदिप पाटील यांचे प्रयत्न 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 💠🌟💠🌟

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे.या बाजारपेठेच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन चालविताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. यातच वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनाही खूप त्रास होत होता.अखेर वाहतूक पोलीस संदिप पाटील यांच्या प्रयत्नातून मोहोपाडा प्रवेशव्दाराजवळील रस्त्याची डागडुजी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेत आसपासच्या भागातील नागरिकांची रेलचेल असल्याने येथील बाजारपेठेला महत्त्व आहे.पावसाल्यात मोहोपाडा प्रवेशव्दाराजवळील रस्त्याची दुरवस्था होवून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.या खड्यात वाहने आदलल्याने अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले होते.तसेच अनेक वाहनचालकांना व्याधींनी ग्रासले होते.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने रसायनी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलीस शिपाई संदिप पाटील यांनी माजी सरपंच सुनील सोनावले यांना सदर समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावयाची विनंती करताच सोनावले यांनी सिमेंट खडी काॅक्रीट मालाचे मिश्रण मोहोपाडा रस्त्यांवरील खड्ड्यांत टाकून खड्डे बुजविले.मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळील रस्त्याचे खड्डे बुजल्याने वाहनचालक नागरिकांनी वाहतूक पोलिस संदिप पाटील आणि माजी सरपंच सुनील सोनावले यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.