Press "Enter" to skip to content

सेवानिवृत्तशिक्षक चंद्रकांत आपणकर गुरुजी उर्फ चंदू भाई यांचे निधन


सिटी बेल लाइव्ह / रोहे (नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के) 🔷🔶🔷🔶


रोहा तालुक्यातील  खारी- खारगाव विभागातील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक,ज्ञानाचा अखंड झरा,साहित्यिक,शैक्षणिक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील हरहुन्नरी विनोद वीर,रंगकर्मी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खारगाव ग्रा. पं. तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गोविंद आपणकर उर्फ चंदू भाई यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन  झाले.त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ- श्रेष्ठ अष्टपैलू समाजसेवकाच्या झंझावाताचा आज अखेरचा अस्त झाला.
  

त्यांचे मुळगाव अलिबाग तालुक्यातील खार – पेढांबे चंदू भाईंना दोन भाऊ सुरेश आणि चिंतामणी आणि एक बहिण मंदा,पत्नी गुलाब ताई त्याही प्राथमिक शिक्षिका,दोन मुलगे थोरला मुलगा डॉ.तेजकुमार,धाकटा मुलगा सतेज याला सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्राची आवड,दोन मुली मोहिनी आणि देवयानी ( बेबी)दोन्ही सूना शिक्षिका असे छोटे खाणी उच्च शिक्षित सधन कुटुंब. खारगाव ग्राम पंचायती च्या माजी सरपंच गुलाबताई आपणकर यांचे पती तर विद्यमान सलोनी सतेज आपणकर यांचे सासरे होत.
  

भाईंचे प्राथमिक शिक्षण ते मॅट्रिक ११वी पर्यंतचे शिक्षण अलिबाग येथेच झाले.प्रथम मित्रांच्या सोबतीने मुंबई सारख्या शहरात प्रथम अग्निशमन दलात मुलाखत दिली तेथे त्यांची शरीर शष्टी किरकोळ असल्याने त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाकारले,त्यानंतर १० मार्च १९६२ साली आरोग्य सेवक म्हणून काम केले अगदी दोन वर्षांच्या कालावधी नंतर ०६ जुलै १९६४ साली प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली.

त्यानंतर खऱ्या अर्थाने भाईंचे जीवन प्रवास सुरू झाला तो आजतागायत कायम स्वरुपी कवी मनाचे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,लिखाणाची विशेष आवड असल्याने प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची करणारे थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना १९९८ साली भाई साहेब पाशिलकर, यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले.

विनोद,उखाणे,नकला  करणे ,लिखाण हे त्यांचे आवडीचेच विषय होते. त्यांची  “बाळू मुंबईला जातो” ही विशेष गाजली तत्कालीन कलेक्टर माननीय रघुनाथ वाघ साहेबांनी पाट थोपटून विशेष दाद दिली.साक्षरता अभियानातील बरीचशी सामाजिक प्रबोधनाची गाणी भाईंनीच लिहली होती त्यामुळे रोहा तालुक्याचे नाव साऱ्या जिल्ह्यामध्ये गाजले. त्यांनी दोन नाटक स्वतः काढली १)तूच माझी आई,२)आंधळं प्रेम या नाटकाचे रोहा तालुक्यातील डोंगरी येथे यशस्वी प्रयोग केले,त्यांनी विद्यमान खासदार सुनिल तटकरे, त्यांचे राजकीय क्षेत्रातील गुरु रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,शिक्षण सभापती भाईसाहेब पाशिलकर,पालकमंत्री अदिती ताई तटकरे,माजी आमदार अवधूत तटकरे,दिनाभाई मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांवर तब्बल ९० गाणी विशेष लोकप्रिय झाली.
 

एक कुशल नेतृत्व,गोर-गरीबांचे कैवारी हे खारी – खारगाव – गौळवाडी पंचक्रोशीला लाभले हे एक मोठे वरदानच होते. त्यांच्या अचानक जाण्याने  खारी – खारगाव – गौळवाडी- तारेघर पंचक्रोशीसह मुळगाव अलिबाग तालुक्यातील खार – पेढांबे पंचक्रोशीची अपरिमित हानी झाली असून  फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांचा हा सहा ते सात दशकांपेक्षा अधिक काळ शिक्षक,समाज सेवेचा प्रवास अतिशय खडतर आणि थक्क करणारा असा अतिशय कठीण परिस्थितीत पुढाकार घेत कोपरी सारख्या गोर गरीबांचे आर्थिक दुर्बल घटकातील वाड्या वस्त्या भागातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण घेता यावं यासाठी प्रसंगी विद्यार्थी वर्गाचे पालकत्व स्वीकारून,अहोरात्र मेहनत,अपार कष्ट,महत्त्वपूर्ण योगदान देत पायपीट करून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल हे ध्येय निश्चित केले होते.

त्यांची दोन वेळा बाय पास सर्जरी झाली तरी सुद्धा प्रचंड आत्मविश्वासाच्या, सकारात्मक विचारसरणीच्या बळावर विनोद शैली जागृत ठेवीत प्रेत्यकाची काळजी घेत सर्वांची प्रेमाने व आपुलकीने विचारपूस करायचे घरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे कृपा आशिर्वाद घेत मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसी भाईंना थोडे अस्वस्थ जाणवू लागले हृदय रोग तज्ञ डॉ.अशोक जाधव यांच्या नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यासाठी नेले असता त्यांचे अगोदरच अल्पशा हृदय विकाराच्या आजाराने प्राणज्योत मावळली.
  

आजपर्यंत गुरु नगर  रहिवासीसह पंचक्रोशीकरीता उल्लेखीय कार्य व  प्रचंड मेहनत घेणारा त्यांच्यासारखा हरहुन्नरी कार्यकर्ता होणे अशक्यच! खरोखरच खारी  विभागाने आज सर्वात अनुभवी आणि जेष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ता गमावलेल्याने आज खऱ्या अर्थाने पितृतुल्य छत्रास मुकलो आहोत पोरके झालो आहोत तसेच फार मोठी अपरिमित हानी झाली आहे असे येथील प्रत्येक व्यक्तींच्या मनातील भाव प्रगट होताना दिसत आहे.
 

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे,दोन मुली,जावई,सूना नातवंडे,भाऊ बंद असे मोठा परिवार आहे,त्यांच्या निधनाने आपणकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून संपूर्ण खारी – खारगाव विभागासह संपूर्ण पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.

अंतयात्रे समयी आजी माजी सरपंच,ग्रामपंचायत  सदस्य,तसेच गाव कमिटी अध्यक्ष,अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील सानेगाव खारी – चणेरा विभागासह संपूर्ण पंचक्रोशी परिसराचे खारी काजुवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे समस्त अपेष्टीत नातेवाईक परिवार,सगे- सोयरे,समाज बांधव,सामाजिक कार्यकर्ते राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील सांप्रदायिक मंडळी तसेच विविध क्षेत्रातील,शिक्षक वृंद,पत्रकार मित्र,वैद्यकीय क्षेत्रातील मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

यासमयी समाज बांधवांनी आपल्या मनातील भावना प्रगट करताना सांगितले की.आजमितीस खरोखरच चंद्रकांत आपणकर गुरुजी उर्फ चंदू भाई यांच्या निधनाने  ज्ञानाचा अखंड प्रवाहित झरा,साहित्यिक क्षेत्रातील हरहुन्नरी तेजस्वी ताऱ्याचा अस्त झाले असून सर्वात जुणे-जाणते अनुभवी, कवी मनाचे थोर  विचारवंत,साहित्यिक,हाडाचे शिक्षक, मार्गदर्शक आणि जेष्ठ-श्रेष्ठ होत करू अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,गोर-गरिबांचे कैवारी गमावल्याने पितृतुल्य छत्रास हरपलो असून फार मोठी  न भरून येणारी मोठी हानी पोकळी निर्माण झाली संपूर्ण पंचक्रोशी चांगल्या सुसंस्कृत विचाराच्या व्यक्तिमत्त्वास मुकली असून पोरकी झाली आहे त्याचे अतीव दुःख होत आहे असे भावनिक मनोगत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत खारी  येथील वैकुंठभूमी मध्ये मुलगा डॉ.तेजकुमार आणि सतेज यांच्या हस्ते अग्नी संस्कार करण्यात आले.
  

त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१२/०९/२०२०
तर अंतिम धार्मिक विधी तेरावे मंगळवार दि.१५/०९/२०२०रोजी श्री गुरु नगर – खारी  येथील राहत्या घरी होतील  असे त्यांचा निकटर्तीयांद्वारे सांगण्यात आले आहे..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.