- आंदोलनाची दखल घेऊन 8 सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन
सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 🔶🔷🔶🔷
पेणच्या को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत १० वर्षांपूर्वी सुमारे ७५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे त्यातील सुमारे २ लाख ठेवीदारांना आजतागायत न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी अखेर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असून ७ सप्टेंबर रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असल्याने त्या अनुषंगाने आज पेण प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात आली.
या बैठकीत प्रांताधिकारी यांनी देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आहे सदर ठेवीदार हे काही प्रमाणात जेष्ठ नागरिक असल्याने धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर आंदोलन हे पुढे ढकलण्यात यावे असे उपस्थित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले असता ठेवीदार मात्र आंदोलन करणारच असल्याचे सांगून शासनानी ठेवीदारांना वा-यावर सोडले आहे. पेण अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शिशिर धारकर यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील, तत्कालीन आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लेखी पत्र देऊन दरमहा ४० कोटी रुपये वसूल करून देण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांनी आजतागायत कोणतीही रक्कम वसूल करून दिली नाही.
अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपींच्या मालमत्तेचे कोणतेही व्यवहार न करण्याचे आदेश असताना देखील अनेक आरोपींच्या मालमत्तेचे व्यवहार होत आहेत असा आरोप नरेंद्र जाधव यांनी केला आहे.सदर आंदोलनाची दखल घेऊन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लावण्यात आले असल्याचे पत्र देण्यात आले आहे.






Be First to Comment