सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात व सोशल डीसटनस पाळून साजरा झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष श्री नूरा शेख सर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी मान्यवरांचे स्वागत करून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी भूषविले.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की,आपल्या जीवनात गुरूचे स्थान अत्यंत मौलिक आहे.भारतीय परंपरेनुसार आई, वडीला नंतर गुरूचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात वंदनीय आहे.गुरुबद्दल,शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने पाच सप्टेंबर या भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो. अध्यक्षांनी या कार्यक्रमा निमित्ताने सर्व शिक्षकास शुभेच्छा देऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच आता कोवीड काळात या जासई विद्यालयातील ज्या शिक्षकांनी कोवीड योध्दा म्हणून उल्लेखनीय कार्य केले अशा शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे चेअरमन श्री अरुण जगे हे उपस्थित होते.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री खाडे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.






Be First to Comment