कोरोना महामारी मुळे यंदाचे वर्षी गौरा गणेशोत्सव नाही.
सिटी बेल लाईव्ह/पनवेल.
राज्यासह देशावर कोरोना महामारी ते संकट घोंगावत आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत व्यवहार व्यवसाय दुकाने जरी सुरू झाली असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अद्यापही आटोक्यात येत नाही.या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.गणेश चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर लगेचच पनवेल उरण पेण व आलिबाग या तालुक्यांत गौरा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. कोरोना महामारी मुळे यंदाच्या वर्षी बहुतांश गौरा गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहे.
गौरा गणेशोत्सव म्हटले की सगळ्यांच्याच डोळ्यापुढे पहिले गोंडस गणेश रुप उभे रहाते ते ते म्हणजे मार्केटच्या राजाचे.संस्थापक अध्यक्ष एस के नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणारा हा सोहळा म्हणजे पनवेल ची शान आहे. लालबागच्या राजाचे प्रतिरूप म्हणून या गणपतीला ओळखले जाते. पनवेल तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून लोक या ठिकाणी येऊन गर्दी करतात. दोन तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर या गणपतीचे दर्शन होते. हीच होणारी गर्दी टाळण्याच्या मुख्य हेतू ने यंदाचा गौरा गणेशोत्सव साजरा होणार नसल्याचे अध्यक्ष एस के नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
असे असले तरीसुद्धा गणेशपूजनमध्ये खंड पडू नये या उद्देशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी ज्या ठिकाणी मार्केटचा राजा विराजमान होतो त्या ठिकाणी छोटेखानी गणेश पूजन करून,गणेश पूजनाची प्रथा मात्र अखंडित ठेवली. यावेळी पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या की गणेश पूजन यामध्ये खंड पडू नये या प्रामाणिक उद्देशाने आम्ही सोशल डिस्टंसिंग चे सारे नियम पाळत गणेश पूजन केले.श्री गजाननाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली की हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे. यावेळी त्यांच्या समवेत दिलीप अनभुले,अनंता कोळी, नारायण आंबोलकर, शेखर भोपी, महादेव शेठ , कमला मयुर कोळी, भाई ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.


Be First to Comment