Press "Enter" to skip to content

पेण शहरात खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता

पसरलेली रेतिखडी बाजुला करुन रस्त्ते सुस्थितीत करण्याची मागणी 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण शहर (प्रशांत पोतदार)🔷🔶🔷🔶

पेण शहारातील रस्त्यांना खड्डे पडल्याने पावसात खड्यात पाणी साठुन रस्त्याची दैना उडालेली आहे. एस टि आगार जवळील मुख्य रस्त्याला खड्डे पडले आहेत तसेच राजु पोटे मार्गा जवळील रस्त्याची हि अक्षरक्षा खड्यामुळे चाळण झाली आहे.

या खड्यांच्या रस्त्यावरुन जाताना वाहन चालकांना त्रास होत आहे तरी हि रस्ते सुस्थितित करण्यात आलेले नाही गणेशोत्सवा दरम्यान रस्तांची तात्पुर्ती मलमपट्टी करण्यात आली आहे.खड्डे बुजवताना दगडमाती बरोबर टाकण्यात आलेली रेतिखडी रस्त्यावर आली आहे.

पावसामुळे खड्यात डांबरमिश्रित खडी टाकण्यात आलेलेली नसल्याने रेतिखडी रस्त्यावर येउन इतरत्र पसरली आहेनगरपालिके जवळील मुख्य रस्त्याजवळ हि रेतिखडी पसरलेली असल्याने वाहन चालवणे जिकरिचे झाले आहे.खड्यावरील खडी रस्त्यावर पसरल्याने वाहनाचे आपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहि.या रस्त्यावरुन वाहनांची सारखी वर्दळ चालु असल्याने पसरलेली रेतिखडी बाजुला करण्यात यावे तसेच खड्यांना डांबर युक्त रेतिखडीने रस्ते सुस्थितित करावे अशी मागणी होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.