गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा….
रोहा तालुक्यातील दहा शिक्षकांचा केले सन्मानित
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷
रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाने आज शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा…याचे अनुकरण करत रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेसच्या वतीने नागोठण्यासह रोहा तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कोणत्याही परिस्थितीत विध्यार्थांना गुनवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे मोलाचं काम करणाऱ्या सर्वच शिक्षकांना शुभेच्छा देत असतानाच आजच्या ह्या पवित्रदिना निमित्त रोहा तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आदर्श शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करत त्यांना पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत रोहा तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेसच्या वतीने करण्यात आला.रोहा तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष कु.अक्षय अनिल नागोठणेकर, तालुका उपाध्यक्ष कु.शंतनू रटाटे, नागोठणे शहर अध्यक्ष कु.केतन भोय, सचिव ओमकार लाड आणि कु.शुभम उंभरे आदींनी विलास रामचंद्र सुटे रा-देवकान्हे, नारायण गायकर रा.भुनेश्वर, तुकाराम गणपत खांडेकर रा. नागोठणे, संतोष हिराजी खलापकर रा.दमखाडी-रोहा, गजानन जाधव रा.कोलाड-आदिवासी वाडी, श्रीमती विद्या रोहेकर रा.रोहा शहर, लालासाहेब विश्वनाथ जाधव रा.कोकबन, इस्राईल ईस्माईल फकीर रा.चनेरा-विभाग, टिळक खाडे रा. नागोठणे, उल्हास ठाकुर रा.नागोठणे-शहर या दहा आदर्श शिक्षकांच्या प्रत्यक्ष शाळेत तसेच निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल, प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.याचबरोबर आजच्या या शिक्षक दिनाच्या मंगलदिनी या सर्व गुरुजनांचे रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आशिर्वाद घेऊन त्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment