सिटी बेल लाइव्ह / रोहा (नंदकुमार मरवडे/ केशव म्हस्के) 🔷🔶🔷🔶
रोहे शहरातील श्री.संत गोरोबा नगर दमखाडी साखर चौथ गणपती मित्र मंडळ आयोजित भाद्रपद महिन्यातील दह दिवसांचे अनंत चतुर्थी चे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणारी पहिल्याच संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील पेण ,पनवेल, उरण,अलिबाग,रोहा,माणगाव,महाड आदी सर्वच तालुक्यातील गावो गावी सार्वाजिक तसेच घरगुती पद्धतीने साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन होते..
याच अनुषंगाने रोहा शहरातील श्री.संत गोरोबा नगर दमखाडी साखर चौथ गणपती मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव कमिटी- २०२० च्या वतीने यंदाचे ५ वे वर्ष.यावर्षी संपूर्ण जगावर,देशावर,जिल्ह्यावर तसेच रोहा तालुक्यामध्ये ही कोरोना चे वाढते प्रादुर्भाव रोखण्या च्या दृष्टीने शासनाने घालून दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मोठ्या उत्साही वातावरणात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे मनोदय व्यक्त केले.
यावेळी श्री.संत गोरोबा नगर दमखाडी साखर चौथ गणपती मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संकेत शैलेश किर,उपाध्यक्ष केतन लक्ष्मण खळापकर,सदस्य अविनाश शिंदे,शेखर कोल्हाटकर ,आकाश अंबाजी ,रोहित पालवणकर,सूरज कोल्हाटकर, शुभम धाटावकर,सिद्देश धा टावकर,आदी सदस्य मित्र वर्ग उपस्थित दिसत आहेत..


Be First to Comment