सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 🔶🔷🔶🔷
वैकुंठ वाशी हरी भक्त पारायण कै. रमेश पांचाळ यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचे मुळगाव मुक्काम पोस्ट जावळी तालुका औसा जिल्हा लातूर येथील होते. गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते.
वते औसा संस्थांचे पीठा दिपती आदरणीय सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे अत्यंत लाडके शिष्य होते त्यांनी आजाराशी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही ते वारकरी संप्रदायाचे निस्सीम पाईक होते त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्यामागे दोन मुले व पत्नी असा परिवार आहे ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच साई विठ्ठल चरणी विनम्र प्रार्थना. उद्या त्यांच्या 14 चा कार्यक्रम पुणेस्थित त्यांच्या निवास्थानी होणार आहे.
त्यानिमित्त साई मदत कक्ष पुणे यांच्यावतीने त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी व मदत करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन साई मदत कक्ष पुणे चे मार्गदर्शक श्री.राकेश दादा मुगळे, श्री.संजुभाऊ पवळे,श्री.अनीलभाऊ कंधारे यांच्या वतीने पांचाळ यांच्या कुटुंबियाना धान्य स्वरूपात मदत देवून यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होताना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री.मोहन बापू शिंदे,श्री. दीपक मुगावे व संपूर्ण साई विठ्ठल भक्त परिवार उपस्थित होते.






Be First to Comment