सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔷🔶
हुतात्मा हिराजी पाटील रोड वरील नगरपरिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या आणि सध्या वापरविना असणाऱ्या लगेज रूमचा उपयोग नागरी सेवेसाठी अर्थातच जेष्ठ नागरिकांच्या हितावह उपयोगात आणावा अशी मागणी नगरपरिषदेतील अभ्यासू विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्याकडे मागणी केली आहे त्याबाबतचे निवेदन त्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात सादर केले आहे.
हुतात्मा हिराजी पाटील रोड वरील गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही जागा अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आजूबाजूला नागरी वस्ती असताना देखील काही राजकीय पक्ष्याच्या मंडळींनी मागील काळात जाणूनबुजून राजकीय द्वेषापोटी या जागेवर शौचालय, मुतारी बांधण्याचा डाव सुध्दा केला होता.
खरे पाहता माथेरानच्या मास्टर प्लॅन मध्ये हातरीक्षा ठेवण्यासाठी हा प्लॉट होता परंतु त्यावेळी संघटनेत खंबीर नेतृत्व नसल्याने सदरची जागा तशीच पडून होती याच जागेवर हळूहळू अतिक्रमण वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी त्याठिकाणी पर्यटकांच्या सेवेसाठी (सामान खोली) लगेज रूम बांधण्यात आला आहे.आजपर्यंत पर्यटकांनी या रूमचा लाभ घेतला नाही.
सदरची खोली रिकामी असल्याने या वास्तूचा सदुपयोग व्हावा यासाठी येथील जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून जेष्ठांना एकत्रित आपले विचार तसेच मते प्रकट करण्यासाठी उत्तम पर्याय आहे याचं ठिकाणी काही वृत्तपत्रे तसेच मासिके वा अन्य करमणुकीची साहित्य ठेवल्यास त्यांच्या मनाचा शीण नक्कीच दूर होऊन जेष्ठ नागरिक यामध्ये रममाण होतील. जेष्ठ नागरिक हे देशाचा मूळ घटक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि प्रेरणादायी विचारातून भावी पिढी घडत असतात त्यासाठी त्यांच्या मानसिक जडनघडणी साठी नगरपरिषदेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
काही सेवाभावी संस्था सुध्दा काही साहित्य देण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे नुकताच लॉक डाऊन सुध्दा उठविण्यात आलेले असून मागील पाच महिन्यांपासून घरात बसून राहिलेल्या जेष्ठांना सुध्दा मनमोकळ्या गप्पा आणि स्वच्छंदी पणे वावरता येण्यासाठी लगेज रूमचा वापर करण्यासाठी दयावा अशी मागणी काँग्रेसचे कार्यशील नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनावर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद संबंधीताकडून मिळेल असा आशावाद जेष्ठांना वाटत आहे.







Be First to Comment