Press "Enter" to skip to content

सुप्रसिद्ध चित्रकार गोमाची जोशी यांचे निधन


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

उरणमधील सुप्रसिद्ध चित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले मोठीजुई गावचे गोमाजी नामदेव जोशी उर्फ जोशी पेंटर यांचे आज दि. ५ सप्टेंबर रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने दुखःद निधन झाले आहे.

मोठीजुई गावातील माजी सरपंच आणि या उरण तालुक्याला ज्ञात असलेले सुप्रसिद्ध चित्रकार की ज्यांनी आपल्या चित्रकलेतून उरणच नव्हे तर गेली ४० वर्ष कलेच्या कारकीर्दीत ठाणे-पनवेल-उरण या परिसरात कलेचं सादरीकरण करुन कला नावारुपाला आणली. मोठीजुई गावातील काही सार्वजनिक गणेश मंडळात श्रीची सुबक मुर्ती त्यांच्या हस्तकलेतून गेली अनेक वर्ष गाजलीही. मोठीजुई गावातील प्रथम झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी निवडणूक लढवून गावात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येऊन प्रथम सरपंच पदाचा मान त्यांना मिळाला.

आपल्या पदाचा योग्य वापर करुन गावात विविध विकासकामांची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली.मोठीजुई गावचे श्री गणेश मंदीराचं जिर्णोद्धार व्हायला हवं यासाठी स्वतः श्री गणेश मंदीर जिर्णोद्धार मंडळाचे अध्यक्षपद सांभाळून अनेक वर्षाची नवीन मंदीराची असलेली प्रतिक्षा त्यांच्या पदभारातून पुर्ण झाली. मोठीजुई गावचे सेक्रटरी आणि पाणी कमिटीचे अध्यक्षपदही त्यांनी मोठ्या दिलाने सांभाळून गावातील अनेक घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अर्थात उरणकरांना सुप्रसिद्ध असलेले जोशी आर्टसचे मालक आणि सर्वांचे बापू गोमाजी नामदेव जोशी यांचे आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्यावर मोठीजुई येथील स्मशानभुमीत अंत्यसस्कार
करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.