सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷
अनंत चतुर्थीला दहा दिवसांचे विसर्जन केल्यानंतर आज साखरचौथ गणेशोत्सव अंतर्गत खांब विभागात घरगुती तसेच सार्वजनिक स्वरुपात या दिवसाला मोठ्या भक्तीभावाने गणरायांचे आगमण करून उत्सव साजरा करण्यासची फार.मोठी परंपरा लाभली आहे.
आज साखरचौथ गणरायाचे वाजतगाजत आगमन झाल्यावर मोठ्या भक्तिभावाने पुजन व महाआरती करण्यात आली. तसेच या दिड दिवसाचे उत्सवात हरिपाठ,जागर भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहेत.खांब विभागातील विविध गावामध्ये सार्वजनिक व घरगुती स्वरूपात हा दीड दिवसांचा उत्सव साजरा केला जात आहे.
सध्या कोरोना व्हाईरसमुळे सर्वच सण व उत्सव साजरे करण्यासाठी शासकीय नियमानुसार साजरे करावे लागत आहेत.नुकतेच दहा दिवसांचा गणेशोत्सवही शासकीय नियमानुसार साजरा करण्यात आला. त्याच धर्तीवर साखरचौथ गणेशोत्सव देखील शासकीय नियमानुसार व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा केला जात आहे.


Be First to Comment