सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
संगीत क्षेत्राची आवड असणारे सेवानिवृत्त शिक्षक ज. पा. गावंड यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील नामवंत मोहरा हरपला असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
ज. पा. गावंड यांनी आपल्या शिक्षकी पेक्षाने अनेक गुणवंत व उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचे काम प्राणिकपणे केले. विशेष म्हणजे ते उत्कृष्ट तबला वादक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक तसेच गायक म्हणून या परिसरात सुपरिचित होते. आपल्यातील कलागुण त्यांनी मुलांच्या व इतरांच्या अंगी रुजविले. ते शंकराचे परमभक्त होते. त्यामुळे ते न चुकता दर एकादशीला गावातील शिवमंदीरात जाऊन भजनात तल्लीन होत असत.
१९९७ साली शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी संत निरंकारी सत्संगात जाऊन समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते आजतागयत करीत होते. संपूर्ण जीवनभर त्यांनी आपल्या परिवराबरोबर भावांच्या मुलांना सुसंस्कृत करून चांगल्या मार्गाला लावले. लहान थोरांपासून सर्वजण त्यांना अण्णा नांवाने हाक मारीत असत.
आदर्श शिक्षकाबरोबर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. अशा संगीतप्रेमी शिक्षकांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८२ वर्षी दि.४ सप्टेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.






Be First to Comment