रायगड जिल्ह्यात महवितरण कंपनीचा मनमानी कारभार
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔶🔷🔶
मार्च ते जुलै या महिन्यात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देश सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला.याच संधीचा फायदा घेत महवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरु असुन विज ग्राहकांकडुन अतिरिक्त रक्कम उकलले जात असल्याचे तक्रारी समोर येत आहेत.
मार्च ते जुलै महिन्यात लॉकडाऊनमूळे महवितरण कंपनी कडून मिटरची रिंडिग घेण्यासाठी कोणीही न येता विज ग्राहकांना चार महिने अंदाजे विज बिले दिली. चार महिन्या नंतर रिडींग घेऊन मार्च पासुन ऑगस्ट पर्यंत रिडींग प्रमाणे पाच महिन्याची विज बिले विज ग्राहकांना आकारून देण्यात आली आहेत.परंतुु विज ग्राहकांनी पाच महिन्यांची विज बिले भरली आहेत तरीही रिडींग प्रमाणे हि पुर्ण बिले भरावी लागतील असे महावितरण कंपनी कडुन सांगितले जाऊन विज ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम लाद्न्यात येत आहेत.
अगोदरच नागरिक कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे बेरोजगार व महागाईने त्रस्त झालेले नागरिकांना तीन महिन्यांचा विज बिल माफ करावा असे वारंवार सांगण्यात येत होते.परंतुु हे दूरच पण रिडींग शिवाय विज बिल ग्राहकांनी पाच महिन्यांचा बिल भरला आहे तरी तुम्हांला रिडींग प्रमाणे विज बील भरावे लागेल असे सांगितले जात असल्याची तक्रार पूढे येत आहे.पाली येथील रंजना विश्वनाथ माळी यांचे मार्च ते जुलै महिन्यांची रिडींग ४८७९ एवढी होती म्हणजे पाच महिन्यांची एकच असतांना यांनी १६६० रु. विज भरलेला आहे.नंतर त्यांचे ५०४८ या रिडींग प्रमाणे १९९ युनिटचा पाच महिन्यांचा विज बिल आला आहे.त्यांनी भरेला विज बिलामधुन माझी रक्कम कमी करुन द्यावी अशी मागणी उपकार्यकारी अभियंता पाली यांच्याकडे केली असता तुम्ही भरलेले बील कमी होणार नाही.हे विज बिल तुम्हांला भरावे लागेल असे सांगून विज बिल ग्राहकाची फसवनुक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने वीज धारकांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
आधीपासूनच कोरोना संकट त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमधील विज हि २० ते २५ दिवस बंद झाली होती.परंतुु विज बिले हि कमी केली गेली नाहीत.तर विज बिले अंदाजे दिल्याने विज ग्राहकांना अतिरिक्त रक्कम त्यावर त्यांचे विविध आकारणी कर भरावी लागत आहेत. आशा रायगड जिल्हयातुन रोज अनेक तक्रारी पूढे येत असुन याकडे संबंधीत लक्ष देणे गरजेचे आहे असे विज बिल ग्राहकांकडून बोलले जात आहे.
ग्रामीण भागातील तीन महिन्यांची वीज बिले शासनाने माफ करावी
गेली सहा ते सात महिन्यांपासून ग्रामीण भागातील जनतेला कोरोनाशी युद्ध करावा लागत आहे त्यातच मार्च ते जुलै हे चार महिने तर अक्षरशः लॉक डाऊन मध्ये रोजनदारी करणाऱ्यांवर मोठी संक्रात निर्माण झाली आहे त्यातच महागाईचा बडगा कायम आहे विविध पातळीवर ग्रामीण भागातील जनतेची वीज बिले माफ करण्यासाठी अनेकांनी मागणी केली तरी देखील वीज वितरक कंपनीने वीज बिल माफ करणे सोडाच मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळत वाढीव वीजबिल देत रक्कम भरण्याची मागणी करत आहेत तरी शासनाने ग्रामीण भागातील जनतेची लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम जांभेकर व तुकाराम सानप यांनी केली आहे.






Be First to Comment