सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिचा कर्जत शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्वीटला उत्तर देताना मुंबई म्हणजे p o k असल्यासारखे वाटते आहे. कंगना राणावत ने केलेल्या विधानाचा जोरदार निषेध करण्यासाठी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, महिला पदाधिकारी सुरेखा शितोळे, कर्जत शहर संपर्क संघटक सायली शहासने, नगरसेविका संचिता पाटील, आशा पालकर, शिल्पा दगडे, भारती शिंदे आफ्रिन चौगुले, मीना कुलकर्णी, समिया चौगुले आदीं काल दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कर्जत मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौका मध्ये जमा झाल्या त्यांनी कंगनाच्या फोटो जाळून तिचा जाहीर निषेध केला.






Be First to Comment