सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔶🔷
रोहा शहरात अनेक वर्षांपासून नवरुपाला असणाऱ्या ट्रिंकल ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रमोद ग्यानचंद जैन तर उपाध्यक्ष पदी दिलीप ना.जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ट्रिंकल फ्रेंड्स ग्रुपची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.३/९/२०२० रोजी सलील खातू (राजू केबल)यांच्या फार्म हाऊस येथे सोशल डिस्टन्सचा पालन करून आयोजित करण्यात आली होती. यासभेत या ग्रुपच्या अध्यक्षपदी बजाज शोरुमचे मालक प्रमोद जैन,उपध्यक्षपदी दिलीप जैन,खजिनदार विलास गुजर,यांची निवड करण्यात आली.यावेळी नगरसेवक महेन्द्र गुजर,राजू जैन,मोती शेठ जैन,परेश दामानी,माजी अध्यक्ष महेश जैन, कैलास जैन,प्रशांत गुजर,राकेश जैन,दिपक जैन,राजेश जैन,महावीर जैन,अनिल जैन,जितेन्द्र जैन,सैफि रोहावाला,टायरी रोहावाला संदीप जैन उपस्थित होते.
ट्रिंकल फ्रेंड्स ग्रुप हि संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रात मोलाचे कार्य करीत असुन या वर्षी हि भरगच्छ कार्यक्रम केला जाईल असे अध्यक्ष प्रमोद जैन यांनी शेवटी सांगितले. नव निर्वाचित अध्यक्षपदी प्रमोद जैन उपध्यक्षपदी दिलीप जैन व सर्व निवड कमेटीचे रोहा नगर अध्यक्ष संतोष पोटफोडे,रोहा तालुका शिवसेना प्रमुख समिर शेडगे यांनी अभिनंदन केले आहे.






Be First to Comment