सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
कोरोना जागतीक महामारीमुळे आदिवासी समुह हा आधिक प्रभावीत झाला असुन या समुहाला धिर देणेसाठी राज्यसरकारने मोफत खावटी वाटपाचा निर्णय घेतला आसून खावटी मध्ये दिली जाणारी मदत वाढवून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे आदिवासी मंत्र्याकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे.
1978 साली राज्य सरकारने आदिवासी च्या विकासासाठी नवसंजीवनी योजना जाहिर केली होती, या योजने अतंर्गत खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली होती. या खावटी कर्ज योजनेत प्रती आदिवासी कुटुंबांना चार हजाराची मदत केली जात होती, तेच निकष आताच्या सरकारने मान्य करत दोन हजार रोख व दोन हजाराचे धान्य मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारने मागील मंत्रीमंडळ बैठकीत केली आहे. या निर्णयाचे आमदार थोरवे यांनी स्वागत केले आहे मात्र चार हजाराची मदत ही खुपच तुटपुंजी असून वाढलेली महागाई, रोजगार नाही अशा काळात एवढ्या कमी मदती मध्ये आदिवासीना दिलासा मिळणार नाही.

किमान तिन महिने धान्य पूरेल अशा उद्देशाने आपण ही योजना राबवणार असू तर किमाण प्रति कुटुंब दहा हजार रूपयाची मदत केली गेली जावी अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यानी आदिवासी विकास मंत्री याचे कडे केली आहे.






Be First to Comment