फिल्डवर प्रत्यक्ष भेटी देउन शासनाच्या विवीध योजनाचा केला आभ्यास
सिटी बेल लाइव्ह / कर्जत – (संजय गायकवाड) 🔶🔷🔷🔶
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे सुचने नुसार प्रशिक्षणार्थी आय ए एस आधिकारी माणिक घौस यांनी कर्जत तालूक्यातील आदिवासी भागात भेट देत शासनाच्या विवीध योजनाची माहिती घेत अभ्यास केला.

कर्जत शहरात आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वस्तीगृहास भेट देऊन शैक्षणिक व भौतीक सोई सूविधाची माहिती घेतली. आदिम जमातीसाठी आदिवासी विकास विभागाचे वतीने बाधंण्यात आलेल्या कडाव येथील घरकूलाची पाहणी केल्यानंतर घौस यांनी मोग्रज ते पिगंळस रस्ता, समाज मंदिर, पिंगळस आश्रमशाळा यांना भेटी दिल्या नंतर धोतरे नदिवर बाधंलेल्या गणपती घाटाची पाहणी करून कूपोषीत मुलांना फायदेशीर ठरलेल्या भारतरत्न डॉ. ए.पि.जे .अब्दुल कलाम अमृत आहार योजना व अगंणवाडी सेवा या बाबतीत माहिती घेतली व ही योजना राबताना येणाऱ्या अडचणी, होणारे फायदे याबाब माहिती घेतली.

माणिक घौस यांच्या दौ-या च्या वैळी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प चे निरिक्षक जगदीश भानुशाली, दिशा केंद्र कार्यकर्ते अशोक जंगले, पंचायत समीतीच्या उपसभापती भीमाबाई पवार, पंचायत समीती विस्तार आधिकारी बि. एच. जाधव, आर एच इ काशीनाथ गायकवाड, एकात्मीक बालविकास चे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, निशीगंधा भवाळ, अभियंता गोपणे आदी उपस्थित होते.






Be First to Comment