सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे ( नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷
रोहे तालुक्यातील खांब – पालदाड मार्गावर वाढलेल्या झाडी झुडपांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवासाच्या दृष्टीने सुरळीत परंतू तितकाच असुरक्षित समजल्या जाणाऱ्या या मार्गावर पावसामुळे वाढलेली झाडी झुडपांमुळे सद्यस्थितीत अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यातील अंतर्गत मार्गापैकी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या मार्गावरील देवकान्हे ते चिल्हे इथपर्यंत ठिकठिकाणी पडलेले लहान मोठे खड्डे, रस्त्यावर पसरलेले छोटे मोठे दगड गोटे यामुळे येथून मार्गक्रमण करताना अक्षरक्षः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यातच पावसामुळे येथे वाढलेल्या मोठाल्या झाडी झुडपांमुळे तर अपघाताला आयतेच निमंत्रण मिळत आहे.
वाढलेली झाडी झुडपे फार मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने त्यांचा तोल जाऊन रस्त्यावर आली असल्याने समोरून येणारे वाहन जवळ आले तरी बरोबर अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघातही घडून येत आहेत.तर दैनंदिन वाहतूक व प्रवासाचा विचार करता येथून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. तर कंपनी कामगार, शेतकरी वर्ग, पायी चालणारे व सयकलवरून प्रवास करणारे प्रवासी तसेच विद्यार्थी वर्ग यांना येथून प्रवास करताना मोठी खबरदारी घ्यावी लागत आहे.
मागील वर्षी याच सुमारास या मार्गावर ब-याचशा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.काही ठिकाणी असलेला अरूंद रस्ता व साईडपट्टीचा अभाव असल्याने येथून मार्गक्रमण करताना फार मोठी खबरदारी घ्यावी लागत असल्याने संबंधितांनी या गंभीर समस्येकडे लवकरात लवकर लक्ष पुरवून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रवासी व स्थानिक रहिवासी नागरिकांतून बोलले जात आहे.






Be First to Comment