Press "Enter" to skip to content

शिवसेना उरण तालुका महिला आघाडीने कंगना राणावतचा पुतळा जाळून निषेध


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

शिवसेना उरण तालुका व महिला आघाडीच्या वतीने अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबई शहर व मुंबई पोलिसांविरुद्ध केलेल्या बेताल व्यक्तव्याचा आणि मुंबई शहराची “Pakistan-occupied Kashmir” अशी तुलना केल्याबद्दल माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध करण्यात आला.

ज्या शहरामध्ये पैसे कमवून मोठे होऊन सेलिब्रिटी झालेल्या कंगना राणावतची अशी बोलण्याची हिंमत कशी होते ??? असा सवाल करून उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, गटनेते गणेश शिंदे, तालुकासंघटक बी.एन.डाकी यांनी जाहीर निषेध केला.

यावेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, महिला उपजिल्हासंघटक ममता पाटील, विधानसभा संघटक ज्योती म्हात्रे, तालुकासंघटक शहर सुजाता गायकवाड, शहरसंघटक मेघा मेस्त्री, शहर संपर्कसंघटक वंदना पवार, उपतालुकासंघटक के.एम.घरत, अवजड वाहतूक सेना तालुकाअध्यक्ष चेतन म्हात्रे, केगांव सरपंच कविता पाटील, केगांव मा.सरपंच जगजीवन नाईक, चिरनेर ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, महिला शाखाप्रमुख संजना कोष्टी, महिला शाखाप्रमुख रश्मी घरत व शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.