सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
महा. अंनिस म्हसळा शाखेचे माजी अध्यक्ष प्रविण करडे यांचे कोरोनामुळे बुधवारी (दि.2) रात्री मुंबई येथे निधन झाले. कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार माजविला असून अनेकांचा बळी घेतला आहे, प्रवीण करडे यांच्या निधनाने अंनिस चळवळीत पोकळी निर्माण झाल्याची शोकाकुल प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रवीण करडे यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केल्यानंतर शेवटी केंद्र प्रमुख ते शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत ते पोहोचले होते. कोकण विभागीय जातपंचायती विरुद्ध एल्गार परिषदेनिमित्त बहिष्कृत कुटुंबांच्या भेटीसाठी त्यांनी म्हसळा तालुक्यातील वडवली व वारळ या ठिकाणी अंनिस कार्यकर्त्यांना सहकार्य केले होते. ते उत्कृष्ट सूत्रसंचालक, कवी व संगीतकार होते. कोमसाप म्हसळा तालुक्याचे पदाधिकारी देखील होते.






Be First to Comment