Press "Enter" to skip to content

उरणमध्ये ३७ पॉझिटीव्ह तर १६ जणांना डिस्चार्ज


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ३७ जण सापडले आहेत. १६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर आज कोणीही मयत नाही.

आज एकूण पॉझिटीव्ह १४५२, उपचार करून बरे झालेले ११७२, उपचार घेणारे २१०, मयत ७० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज चाणजे ४, साईसदन उरण १, मुळेखंड १, जसखार ३, आंबेनगर करंजा रोड २, नेव्हल कॉलनी १, मच्छी मार्केट उरण १, नागाव ४, ओमकार कॉलनी कुंभारवाडा २, खोपटे १, बौद्धवाडा उरण १, भेंडखळ ३, बोकडविरा १, नवीन शेवा २, नेव्हल स्टेशन करंजा २, बापूशेठवाडी उरण १, जासई २, रांजणपाडा १, आंदनगर १, बोरी साई प्रेरणा सोसायटी १, चिरले २ असे एकूण ३७ पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर चाणजे १, धुतुम १, बोरी उरण ३, सावरखार १, देऊलवाडी उरण ३, चिरनेर १, जासई १, करंजा १, जेएनपीटी २, भेंडखळ १, कोप्रोली १ असे एकूण १६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

आज कोणीही मयत नाही ही एक जमेची बाजू मानली तरी आज सापडलेल्या पॉझिटीव्हचा आकडा मोठा असल्याने उरणकरांसाठी चिंतेची मानली जाते. उद्या साखर चतुर्थीच्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी सावध राहूनच हा उत्सव साजरा करावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.