Press "Enter" to skip to content

जितेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

जितेंद्र म्हात्रे हा धडाडीचा कार्यकर्ता –

माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांचे गौरवोद्गार 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) 🔶🔷🔶🔷

धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या हातून चांगली कामे होत असतात . जितेंद्र म्हात्रे हा सतत धडपडणारा धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्यांची धडपड जेंव्हा पाण्याची पाईपलाईन फुटली होती तेंव्हा आम्ही जवळून पाहिली आहे आपल्या गावकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून अक्षरशः २४ तास त्या ठिकाणी उभा राहून काम करून घेताना आम्ही पाहिले असून आजही त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवत गावातील दिव्यांगांना आणि मागासांना ग्रामपंचायतीच्या निधीतून हात देण्याचा काम केले असल्याचे गौरोद्देगार पनवेलचे माजी नगराध्यक्ष तथा शेकापचे लढाऊ नेते जे.एम. म्हात्रे यांनी न्हावा येथे काढले.

ते न्हावा ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना अनुदान वाटप , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅब वाटप आणि घरघंटी वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज न्हावा गावातला शाळेच्या सभागृहात सामाजिक अंतराचे भान राखून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर उत्सवमुर्ती सरपंच जितेंद्र म्हात्रे , यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे माजी डँशिंग नगराध्यक्ष जे . एम . म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य श्री रविंद्र पाटील, सरपंच श्री जितेंद्र म्हात्रे, उप सरपंच सौ. साधना तांडेल, माजी उपसरपंच श्री किसन पाटील, ग्राम सुधारक मंडळाचे अध्यक्ष श्री आशिष पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्री प्रदिप ठाकुर, महीला मंडळ अध्यक्षा सौ मीनाक्षी पाटील, माजी महीला मंडळ अध्यक्ष सौ कांता ठाकुर, ग्राम विकास अधिकारी श्री एन,आर, शेंडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ऊपस्थित होते.

न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री जितेंद्र म्हात्रे यांच्या 52 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्हावे ग्रामपंचायत फंडातून 5% दिव्यांग निधीतून 33 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 7000 अनुदान व 3 लाभार्थ्याना घरघंटी चे वाटप तसेच ग्रामपंचायत फंडातून 15% निधीतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचे 4 टॅबचे वाटप आज माजी नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास सामाजिक अंतराचे भान राखण्याबरोबरच उपस्थितांचे हात सॅनिटायझर करणे आदीवर आयोजकांनी भर दिल्याचे दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.