सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असून या परिस्थितीत सेवा देणारे पोलीस, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्याना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फेसशिल्ङचे वाटप करण्यात आले.

खालापूर तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या अठराशे पर्यंत पोहचली आहे.तर कोरोनामुळे मृत्यूच्या आकङ्याने पंच्च्याहत्तरी गाठली आहे.आरोग्य यंञणा फक्त आकङेवारी देण्यापुरती मर्यादित राहिल्याने नागरिकानी स्वतः खबरदारी घ्या असे आवाहन खालापूर मनसे कङून करण्यात येत आहे.खालापूर पोलीस ठाणे कर्मचारी,मटणमच्छी विक्रेते,फळ व भाजीपाला विक्रेत्याना फेसशिल्ङचे वाटप करण्यात आले.

यावेळी मनसे महिला तालुकाध्यक्षा हेमलता चिंबुळकर,शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी,प्रदिप लोते,स्वप्निल फराट,हितेश मिरवणकर,रोहन शिंदे सह कार्यकर्त्यानी कोरोना बाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला.







Be First to Comment