Press "Enter" to skip to content

वृक्षारोपण कार्यक्रम : अखेर माथेरान नगरपरिषदेला मुहूर्त सापडला !

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔷🔶



माथेरान नगरपरिषदे मार्फत मागील तीन महिन्यांपासून आणण्यात आलेल्या काही रोपांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.विशेष म्हणजे या आणण्यात आलेल्या रोपांमधील काही रोपे केंव्हाच सुकून गेली होती ज्या रोपांमध्ये जीव होता त्यांचे आज दि.४ सप्टेंबर रोजी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत कपाडिया मार्केट तसेच मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.ही सर्व रोपे येथील नौरोजी उद्यानात लागवडीच्या प्रतीक्षेत होती. तीन महिन्यांनी ही रोपे लावण्यासाठी नगरपरिषदेला मुहूर्त सापडल्यामुळेह्या रोपांनी सुध्दा सुटकेचा निःश्वास सोडला आहे तर स्थानिकांमध्ये सुध्दा आगामी काळात माथेरान मध्ये हरित आणि गार वातावरण निर्माण होणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत आहे.

यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत,विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे,मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, आरोग्य अधिकारी अभिमन्यू येळवंडे यांसह अन्य नगरसेवक, नगरसेविका नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

माथेरान मध्ये दरवर्षी पावसाळ्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात दोन हजार पेक्षाही अधिक जुनी झाडे मुळासहित उन्मळून पडली.माथेरानची खरी ओळख ही इथल्या नैसर्गिक वृक्षराजीची थंड हवा आणि त्यामुळेच निर्माण होणाऱ्या गारव्याच्या आकर्षणामुळेच इथे बाराही महिने पर्यटकांची रेलचेल सुरु असते. त्यामुळे पावसाळ्यात निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात नामशेष झालेल्या वृक्षांची कमतरता भरून काढण्यासाठी निदान पाच हजार रोपांच्या लागवडीची आवश्यकता होती.

मार्च महिन्यापासून लॉक डाऊन झाल्यामुळे शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक होते त्यानुसारच नुकताच लॉक डाऊन उठविण्यात आल्यानंतर ह्या दीडशे रोपांतील काही रोपांच्या लागवडीसाठी
त्यातूनही नगरपरिषदेने मुहूर्त काढून हा सेवाभावी उपक्रम सोशल डिस्टनिंगचे पालन करून यशस्वीपणे पार पाडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.