सिटी बेल लाइव्ह / तळोजा 🔶🔷🔶🔷
के. जी. पी शिक्षण संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी डॉ. प्रभाकर गावकर सरांची कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलित बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय प्राचार्य पदी नियुक्ती केली.
डॉ. प्रभाकर गांवकर सरांचे उच्च शिक्षण (एल.एल.एम.पी.एच.डी) मुंबई विद्यापिठातून झालेले आहे. त्यांना २० वर्षाचा विविध विधी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत असल्याचा दिर्घ अनुभव आहे. बी.सी.टी. (रामशेठ ठाकूर) लॉ कॉलेज, पनवेल-रायगड येथे ९ वर्ष, नालंदा लॉ कॉलेज, बोरीवली-मुंबई येथे ५ वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज, ओरस-सिंधुदुर्ग येथे २ वर्ष, ओरियंटल लॉ कॉलेज, सानपाडा-नवी मुंबई येथे २ वर्ष प्राचार्यपदी कार्यरत होते.
याप्रसंगी एस.व्ही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल कांबळे, उपप्राचार्य डी.बी. महाजन, दि इलाईट पब्लिक स्कुल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य राणे मॅडम, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या माजी प्राचार्य जैसवाल मॅडम उपस्थित होते.






Be First to Comment