कोरोना योद्धा असलेले महसूल, आरोग्य, पोलीस यांच्यासाठीही राखीव बेड उपलब्ध 🔶🔷🔶🔷
कोरोना लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हा 🔷🔶🔶🔷
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचे आवाहन 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)🌟💠🌟💠
टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोना आजारात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध न झाल्याने मृत्यूने गाठले. पत्रकाराबाबत ही दुर्दवी घटना घडल्यानंतर पत्रकारांच्या आरोग्याबाबत काळजी निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पत्रकार कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत आहेत. काही पत्रकारांना कोरोनाचे लागण झाली आहेच, यापुढेही त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड योद्धे असलेले पत्रकार, महसून आरोग्य, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक एक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध ठेवणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वाढता प्रादुर्भाव असल्याने रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची संख्याही कमी पडू लागली आहे. रायगडातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 बेडची अतिरिक्त सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये 40 बेडला व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू करण्यात आले आहे. आठ दहा दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याचे डॉ सुहास माने यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात माणगाव येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असेही डॉ. माने म्हणाले.
टीव्ही 9 चे पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बेड उपलब्ध न झाल्याने निधन झाले. पत्रकारही कोरोना काळात वृत्त संकलनाचे काम करीत आहेत. जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोना लागण झाल्यानंतर रायकर यांच्यासारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात राखीव बेड ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महसूल विभागातील व इतर विभागातील कर्मचाऱ्यासाठीही एक एक बेड राखीव ठेवण्यात येणार आहे.
पत्रकार, पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक एक बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच कोरोना आजाराला कमी लेखू नका. आपल्याला त्रास जाणवू लागल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल व्हा. जेणेकरून त्वरित उपचार करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे.
डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक






Be First to Comment