Press "Enter" to skip to content

ऐतिहासिक किल्ले रायगड व चवदार तळे दर्शनासाठी खुले करा

जेष्ठ पत्रकार मनोज खांबे यांची शासनाकडे मागणी 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔷🔶🔶🔷

कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर राज्य व देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. यादरम्यान शासनाने किल्ले रायगड, शिवप्रेमी, व पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सद्या अन लॉक डाऊन प्रक्रीया सुरु आहे. देशात गोवा तर जिल्ह्यातील माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटन स्थळं खुली करण्याबरोबरच स्फुर्ती केंद्र खुली करावीत असे आवाहन रायगडमधील पत्रकार मनोज खांबे यांनी शासनाला केले आहे.

किल्ले रायगड चार महिन्यांपासून बंद असल्याने शिवप्रेमींना गडावर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येत नाही. तसेच येथील स्थानिक व्यवसायिक देखील अडचणीत सापडले आहेत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि सामाजिक समतेचे प्रतीक, मानवतेच्या उद्धाराचे स्मारक असलेले चवदार तळे दर्शनासाठी खुले करा अन्यथा 19 सप्टेंबर रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उपोषणाला बसणार असल्याबाबतचे निवेदन खांबे यांनी महाड प्रांताधिकारी कार्यालयाला दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.