Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने रोहा तालुक्यासाठी रुग्णवाहिका

सिटी बेल लाइव्ह / रोहा : विकास मेहेतर 🔶🔷🔶🔷

कोरोना वैश्विक महामारीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांना गरज भासल्यास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने रोहा तालुक्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री,युवासेना प्रमुख,शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने, आमदार महेंद्र दळवी यांच्या मागणीनुसार रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार दळवी यांनी शिवसेना रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे यांना रूग्णवाहिकेची चावी देऊन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
सदर प्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर , शिवसेना नेते संतोष निगडे, शिवसेना शहरप्रमुख रुपेश ठोंबरे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.