Press "Enter" to skip to content

पमपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण

समाज माध्यमांव्दारे स्वत : दिली माहिती आणी केले आवाहन

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔷🔶🔷🔶

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ने थैमान घातले आहे. आजपर्यंत अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात चक्क पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना देखील कोरोची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ही माहिती समाज माध्यमांवर दिली आहे.

प्रितम म्हात्रे यांचे जाहीर आवाहन !

पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून मी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.या कालावधीत मला कोरोना सदृश्य त्रास जाणवू लागल्याने माझी अँटीजेन टेस्ट करण्यात आल्यावर मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या आवाहनाच्या माध्यमातून आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करत आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा आपल्या सेवेत रुजू होईन ही अपेक्षा व्यक्त करतो.

माझ्याशी काही संपर्क करायचा असल्यास किंवा कोणती मदत हवी असल्यास फेसबुक, pritamjmhatre55@gmail.com मेल द्वारे अथवा हेल्पलाईन 9326050505, 8542050505 वर संपर्क करू शकता.

आपला,
प्रितम जनार्दन म्हात्रे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.