Press "Enter" to skip to content

Good News आजपासून उरण मोरा -मुंबई लॉंच सेवा सुरू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

कोरोना कोविड १९ वाढत्या प्रादुर्भावयामुळे गेली ४ ते ५ महिन्यापासून बंद असलेली उरण मोरा -मुंबई प्रवासी लॉंच सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे गेले अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोना महामारीचे संकट आल्याने राज्यातील सर्वच ठप्प झाले होते. यामुळे प्रवाशी यंत्रणाही गेली ४ ते ५ महिने पूर्णपणे बंद होती. यामुळे प्रवाशी वर्गात नाराजीचा सूर होता. सदर वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काल जलप्रवासी वाहतुकीस परवानगी दिल्याने त्या आजपासून सुरू झाल्या आहेत.

मोरा येथून मुंबई येथे जाण्यासाठी हा जलमार्ग अधिक सोपा व वेळ वाचविणारा असल्याने प्रवाशी या मार्गाचा वापर सर्रास करतात. आज पासून ही सेवा सुरू झाली असल्याने त्याची माहिती नाही परंतु काही दिवसांतच प्रवाशांची संख्या वाढेल असा विश्वास लॉंचवाले व्यक्त करतात.
उरण मोरा-मुबंई जलवाहतूक आजपासून सुरू करण्यात आली आहे.

हे आहे वेळापत्रक

मुबई वरून सकाळी ११.३०, १.००, २.३०, ४.००, ५.००, ६.०० तर मोरा येथून १२.३०, २.००, ३.३०, ५.००, ६.०० , ७.०० अशा प्रकारे येजा करणार असल्याचे समजते.

प्रवासाकरीता या आहेत अटी

जलप्रवासात मास्क वापरणे, जेट्टीवर ६ फुटाचे अंतर ठेवणे, निर्जंतुकीची व्यवस्था उपलब्ध करणे, प्रवाशी व कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझरचा वापर करणे, जेट्टीपरिसरात थुंकण्यास मनाई, मद्यपान, पान, गुटखा, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई करून कोणी केल्यास दंडात्मक कारवाई , अनावश्यक वस्तुंना हात न लावणे, दर २ तासांनी जलयानांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

वरील सर्व अटींसह प्रवासी जलवाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्यात येईल याची दक्षता सबधितांनी घेणे आवश्यक आहे. सदर आदेशाचे पत्र हे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य बंदर अधिकारी कप्तान संजय शर्मा यांनी दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.