Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त किरण मढवी यांची वृक्षलागवडीची अनोखी संकल्पना


सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील) 🔶🔷🔶🔷

आज उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिरनेर बापुजी मंदिर परिसरातील वनक्षेत्रावर श्री गणेशाच्या २१ पत्रींच्या रोपांची लागवड त्याचप्रमाणे नक्षत्र वन, राशी वन, नवग्रह वाटीका, पंचवाटिका, दिशा वन, सप्तर्षी वन, तसेच हरिशंकरी आणि त्रिवेणी वृक्षारोपण अशा विविध प्रकारची अनोख्या पद्धतीने वृक्षलागवड करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

नक्षत्र वनात २७ नक्षत्रांची रोपे, १२ राशीं प्रमाणे १२ रोप, नवग्रहांची ९ रोपे, पंचवटीचे ५ रोप, तर हरिशंकरी आणि त्रिवेणी मधे तीन रोपटे अशा पद्धतीने उत्तम नियोजन व योग्य आखणीनुसार नवी मुंबईतील ही पहिली अनोखी वृक्षलागवड करण्यात आली.

याप्रसंगी चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, नमस्ते मोकल, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत म्हात्रे, वन्यजीव संरक्षक आनंद मढवी, सर्पमित्र काशिनाथ खारपाटील, जयेश खारपाटील, सर्पमित्र विवेक केणी, निवृत्त शिक्षक मोतीराम मढवी, बेलवलीचे दिनेश पाटील सर, वनक्षेत्रपाल राउतराय, वनक्षेत्र रक्षक सूरदास धांडे, किरण देवकर, सनी ढोले, मिलिंद भोईर, जी एस बोरसे, माया भोसले, सुप्रिया कसबे, प्रगतशील शेतकरी सज्जन पवार, कृषीमित्र प्रशांत पवार, गणेश मढवी, वन्यजीव निसर्ग संस्थेचे आणि वटवृक्ष फांऊडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

समाजसेवक किरण मढवी यांच्याअनोख्या कल्पनेच्या विचारांनी साकरलेल्या ह्या वृक्षलागवडीबद्दल उपस्थितांनी भरभरून कौतुक करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.