प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे “कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना” जाहीर 🔷🔶🔷🔶
हॉस्पिटल, पोलीस दल,नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना लागू 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (जिमाका) 💠🌟💠🌟
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था ही कोकणातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे 1998 पासून व राजेंद्र माने तंत्रनिकेतन सन 2010 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबव येथे कार्यरत आहे. करोना या संसर्ग विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल, पोलीस दल, नगरपालिका, महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचारी जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा, म्हणून संस्थेच्या अभियांत्रिकी पदवी, एमबीए व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये त्यांच्या पाल्यांसाठी “कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना” ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतिगृह शिक्षण योजना 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे.
ही योजना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल, पोलीस, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आहे. या योजनेंतर्गत प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात आटोमोबाईल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकसाठी ऑटोमोबाईल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच प्रथम वर्ष एमबीएसाठीही प्रवेश दिला जाईल. अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक यात प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रवेश दिला जाईल. प्रथम वर्ष पदवी व एमबीए मध्ये प्रथम प्राधान्याने प्रवेशित पाल्यांना ही योजना लागू होईल. थेट द्वितीय वर्ष पदवी व पदविकेसाठी शासनाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेशित विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल. ही शिक्षण योजना अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी लागू आहे. प्रवेशावेळी कार्यरत असलेल्या संबंधित विभागाचे शिफारसपत्र आवश्यक आहे.
तरी गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी केले आहे.






Be First to Comment