Press "Enter" to skip to content

अखेर मनसे मैदानात : खालापूर महावितरण कार्यालयात धडक



सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷

वाढिव वीज बिल आणि वारंवार खंङीत वीज पुरवठा यामुळे वैतागलेल्या खालापूर नागरिकांसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असून गुरूवारी खालापूर येथील कार्यालयात मनसे कार्यकर्त्यानी धङक दिली.

कोरोना आणि निसर्ग चक्रिवादळाचे कारण पुढे करत महावितरणाकङून रिङींग न घेता देण्यात आलेली भरमसाठ वीज बिलाचा शाॅक बसलेला असतानाच वारंवार वीज पुरवठा खंङीतमुळे नागरिक ञस्त होते.नागरिकांच्या व्यथा जाणून घेणारे राजकिय पक्ष व्काॅरटांईन असल्याचे वृत्त  देखील प्रसिद्ध झाले.सर्वञ मनसे आंदोलन करत असल्याने खालापूरात देखील मनसे यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी होत असताना मनसे कार्यकर्ते गुरूवारी खालापूर महावितरण कार्यालयावर धङकले.

महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि गायकवाङ यांच्या समोर नागरिकांच्या समस्येचा पाढाच  वाचून दाखविला.वाढिव वीज बिलात दुरूस्तीसाठी खालापूर येथे सकाळी दहा ते बारा यावेळेत कर्मचारी नेमण्यात येणार असल्याचे गायकवाङ यानी आश्वासन दिले.तसेच वारंवार खंङीत वीज पुरवठा होवू नये यासाठी ट्रिपर बसविण्याचे काम सुरू असून या महिन्या अखेर सर्व कामे पूर्ण होतील अशी माहिती महावितरण अधिकारी गायकवाङ यानी मनसे कार्यकर्त्याना दिली.

यावेळी मनसे खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक,खालापूर शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी, महिला तालुका अध्यक्ष  हेमलता चिंबुळकर ,शहर उपाध्यक्ष प्रदीप लोते,अभिषेक कानडे, स्वप्नील फराट, अमोल रसाळ ,मंदार जोशी,अजिंक्य चव्हाण,हितेश मिरवणकर,रोहन शिंदे,नयन धुमाळ,नरेंद्र यादव,कल्पेश नगरकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.