Press "Enter" to skip to content

इंडियन ऑइल टँकिंग या कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी

सिटी बेल लाइव्ह / उरण 🔷🔶🔷🔶

कोव्हीड 19 च्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी चे भान राखत इंडियन ऑइल टँकिंग या कंपनीने, तहसीलदार उरण यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापनास मदतीसाठी एक ऍम्ब्युलन्स भाडेतत्त्वावर घेऊन ती दोन महिन्यासाठी तहसीलदार उरण यांना कोव्हीड 19 उपयोगासाठी देऊ केली आहे.

1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा देऊ केली आहे. ह्या आधी इंडियन ऑइल टँकिंग या कंपनीने, धूतूम, रांजणपाडा, सुरूंग पाडा, उरण येथे धान्य वाटप तसेच जासखार आणि धूतूम येथे मास्क व हॅंडवॉश चे वाटप करुन समाजातील गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे.
यासंदर्भात मॅनेजर मोघे साहेब यांचे पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष श्री रमाकांत म्हात्रे यांनी आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.