मुख्याध्यापक अरुण घाग यांची रयत सेवक कुटुंब कल्याण योजना व कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळावर निवड 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🌟💠🌟💠
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांची 2021 ते 2023 या कालावधीसाठी संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळ सदस्य आणि रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
अरुण घाग यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांना संस्थेच्या लाईफ वर्कर पदी या पूर्वीच नियुक्ती दिली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर गरिबांच्या शिक्षणा साठी स्थापन केलेल्या या रयत शिक्षण संस्थेत श्री घाग सर उपशिक्षक असताना विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून अध्यापन करीत होते, आता मुख्याध्यापक म्हणून ते एक शिस्तप्रिय व गुणवत्ता पूर्वक जासई शाळा चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्या या निवडी बद्दल स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने कामगार नेते सुरेश पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जी.आर. पाटील, शाळेचे चेअरमन अरुण जगे, माजी सभापती नरेश घरत, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, शिक्षक वृंद, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, विद्यार्थी व पालक वर्गाने मुख्याध्यापक अरुण घाग यांचे अभिनंदन केले आहे.






Be First to Comment