सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) 🔷🔶🔶🔷
रोहे तालुक्यातील श्री.क्षेत्र तळवली गावचे रहिवासी श्री.नंदकुमार मरवडे यांनी आपल्या निवासस्थानी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सजावटीमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व त्यांच्या परिवाराने या वर्षीचा उत्सव साधेपणाने साजरा करीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी आपले योगदान असावे या उद्देशाने इको फ्रेंडली बाप्पा ही संकल्पना साकारित पर्यावरण संरक्षण पुरक सजावट करीत कागदापासून तयार केलेली तोरणे,फुलं व पाने यांचा सजावटीसाठी वापर करीत एक वेगळा संदेश दिला.
तर दरवर्षी ते आपल्या ते गणेशोत्सव काळात कधी सजावट तर कधी चलचित्राचे माध्यमातून समाजप्रबोधनपर
वेगवेगळा द्रुश्य साकारून प्रबोधनाचे कार्य करीत आले आहे आहेत. तर वर्षीच्या उत्सवातून सजावटीतून कागदकामावर भर देऊन इको फ्रेंडली बाप्पा ही संकल्पना राबविल्याने त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.


Be First to Comment