सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 🔷🔶🔷🔶
रायगड जिल्ह्याची आयोध्या म्हणून ओळख असणाऱ्या पेण तालुक्यातील बळवली गावातील ह.भ.प. नथुराम तुकाराम पाटील उर्फ नथुबुवा यांचे आज वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. नथुबुवा हे भजनसम्राट होते. त्यांनी प्रवचन, कीर्तन, भजन, भारुड, हरिपाठ गायले आहेत.
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या भजन स्पर्धेत सहभाग घेऊन श्री राम भजन मंडळास अनेक प्रथम क्रमांक मिळवून दिले आहेत. तसेच पंढरपूर व आळंदी येथील धर्मशाळा निर्माण कार्यात सक्रिय सहभागी असायचा. 1975 ते 1990 सालापर्यंत त्यांनी पोलीस पाटील म्हणून सेवा केली आहे. नथुराम तुकाराम पाटील हे पेण तालुका जेष्ठ नागरिक संघाचे सक्रिय सदस्य होते. तर पेण तालुका मराठी साहित्य कला मंचच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. संस्कार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात ही ते सक्रिय होते.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी मुक्ताई पाटील यांचेही वृद्धपकाळाने निधन झाले असून, नथुबुवा यांना माजी सरपंच रमेश पाटील व दत्तात्रेय पाटील ही दोन मुले, पाच मुली, वीस नातवंड असा मोठा परिवार आहे. नथुबुवा यांच्या निधनानंतर पेणचे आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शिवसेना नेते जगदीश ठाकूर, बळवली सरपंच शेकाप युवा नेते संजय डंगर, सदस्य प्रकाश पाटील, कृष्णा पाटील, रामदास माऊली, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अविनाश पाटील, यांनी दुःख व्यक्त केले आहे.






Be First to Comment