
सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🌟💠🌟💠
गणेशोत्सवानिमित्त ठाकरे-पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान आहेत. याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतले.
या भेटीचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शरद पवार-प्रतिभा पवार, सदानंद सुळे-सुप्रिया सुळे, तेजस-आदित्य ठाकरे तसेच सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलेही उपस्थित होती. तसेच खासदार संजय राऊत हेदेखील बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी संध्याकाळी ही सर्व मंडळी एकत्र जमली होती.


Be First to Comment