Press "Enter" to skip to content

बाप्पा कोरोना महामारीतून आता तूच सोडव


गणरायाला भक्तांची आर्त हाक 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔷🔶


श्री.गणराया म्हणजे सुखकर्ता दुख:हर्ता व सर्व विघ्नांचा नायनाट करणारी देवता म्हणून ओळखली जाते.श्री गणेशाइतकी विविधता अन्य कोणत्याही देवतेत आढळत नाही.१४ विद्या व ६४ कलांचा अधिपती असा तू गणराया सध्या कोरोना सारख्या महामारीने सर्वांना ग्रासले आहे.अशा कठिण काळात श्री.गणराया तूच आपल्या भक्तांचे रक्षण कर व कोरोनासारख्या महाभयानक संकटातून सर्वांना वाचव.अशाप्रकारे साकडे बाप्पा तू जाता जाता तुला घालित आहोत.

कोरोनाच्या महामारीला डिसेंबर २०१९ प्रारंभ झाला.चीनच्या डुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोना व्हाईरसचा प्रचार झाला.या व्हाईरसमुळे वुहान प्रांत हा सा-या जगभर एकदमच प्रकाशझोतात आला.सुरुवातीला वुहान प्रांतापुरता मर्यादित असणारा हा व्हाईरस अति संसर्गजन्य असल्यामुळे बघता बघता सा-या जगभर पसरून हाहाकार उडाला.कोरोना व्हाईरस इतका भयानक वेगाने जगभर पसरला की कोणालाही या व्हाईरसपुढे काहीही करता आले नाही. जगभरातले एकही असे देश सापडणार नाही की जिथे कोरोना व्हाईरस पोहोचला आहे.आजच्या स्थितीत सारे जग कोरोना महामारी या एकाच विषयाभोवती घुटमळते आहे.

जगभरातील बड्या बड्या देशानी कोरोनापुढे हातपाय टेकले आहेत.तिथे अन्य देशांचे काय घेऊन बसलात ! कोरोनाच्या वाढत चाललेल्या प्रकोपामधून बाहेर पडण्यासाठी विविध प्रकारचे उपाय योजले जात आहेत. तर ही साखळी तोडण्यासाठी लाँकडाऊन हा पर्याय पुढे आल्याने सर्वच देशांनी आपापल्या परीने हा पर्याय स्वीकारला.

आपल्या भारत देशामध्ये कोरोना व्हाईरस पसरायला मार्च महिन्यात ख-या अर्थाने सुरूवात झाली. मग आपल्या केंद्र सरकारनेही ताबोडतोब खबरदारीच्या अनेक उपाययोजना राबवित मार्च महिन्याच्या शेवटी लाँकडाऊन पुकारले.सुरूवातीला आठ दिवस, नंतर दहा दिवस,त्यानंतर पंधरा दिवस असे करता करता लाँकडाऊनचा कालावधीही पुढे वाढविण्यात आला.देशभरात एकाकी पुकारलेल्या लाँकडाऊनमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला.देशभरातील नागरिक गोंधळलेल्या आवस्थेत झाले.एकाकी पुकारलेल्या लाँकडाऊनमुळे देशातील सर्वच व्यवहार थांबल्याने देशाचे अर्थचक्र बिघडले.कारखाने बंद झाले.दळणवळण सेवा ठप्प झाली.रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला. अशातच स्थलांतरीतांची समस्या निर्माण झाली. उद्योगधंदे बंद झाल्याने कामधंदा नाही. लोकांना कसे जगावे असा प्रश्न पडला.

मार्च महिन्यात पुकारण्यात आलेला लाँकडाऊन पुढे मे महिन्यापर्यंत वाढविण्यात आला.त्यानंतर अनलाँक प्रक्रिया सुरू झाली. अद्यापही अनलाँक प्रक्रियाही सुरळीतपणे सुरू झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाची भिती जनमानसात इतकी रूजली आहे की,लोकांची मानसिकताही आता दुबळी बनली आहे.सध्याचे आधुनिक युगात सर्वच आजारावर चांगले उपचार शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. कोरोनाचीही लस आज उद्या बाजारात येईल परंतू त्यापुर्वी होणारी महामारी कशी आटोक्यात आणता येईल.याबाबत जगभरात प्रयत्न चालू आहेत.

कोरोना व्हाईरसच्या झपाट्याने होत असलेला प्रादुर्भावामुळे सा-या जगभरातील देशांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीवर अद्याप खात्रीशीर उपाय सापडला नाही,परंतू सामाजिक सुरक्षा, मास्क व फेसकव्हरचा वापर,सँनेटायरचा वापर,शारीरिक स्वच्छता आदी बाबींवर आपण अधिक लक्ष केंद्रीत केले तर किमान स्वत: तरी या महामारीपासून दूर राहू शकतो.गत शतकांमध्येही अशाप्रकारच्या महामारीने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी विज्ञान इतके प्रगत नव्हते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्य हानी झाली होती.सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे.कोरोना महामारीवर ठोस औषध सापडले नाही. परंतू प्रादूर्भाव किंवा साखळी नियंत्रणात कशी आणता येईल यासाठी मात्र चांगले प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना व्हाईरसमुळे सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आल्याने व शासकीय चौकटीतच साजरे करावे लागल्याने सर्वांनी सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले. गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीत साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत सर्वच भक्त श्री.गणेशाजवळ,” कोरोनाची महामारी संपून जाऊ दे व पुर्वीचे सुखाचे दिवस येऊ दे,कोरोना महामारीपासून बाप्पा तूच आम्हांला वाचव अशी आर्त हाक श्री.गणेशभक्तांनी घातली असून अशाच प्रकारची मनोभावे प्रार्थना सर्वत्र करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.