सुमधुर आवाजाची संगीताची मेजवानी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / आवरे (प्रतिनिधी ) 🌟💠🌟💠
संगीताची ओढ़ एवढी असते की संगीताचे श्रवण केल्याने अनेक दुर्द्धर आजार नाहीसे होतात. संगीताची जादू निराली होय. शारदा संगीत विद्यालय नवी मुम्बई तर्फे सुयश क्लासेस आवरे च्या गणराया चरणी अमृतधारा अशी अनमोल संगीताची मेजवानी पेश केली.

रूप पाहत लोचनी , रूपवली , जय रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान , कव्वाली अश्या अनेक भावगीत भक्ति गीतांनी ही संगीताची बहरदार महफ़िल रंगली श्रोते सुधा ही महफ़िल ने मन्त्रमुग्ध होवून गेले. शारदा संगीत विद्यालय नवी मुम्बई प्रस्तुत प्रमोद रसाळ संगीत विशारद , जयदास ठाकुर मृदुनगमनी , अशोक कोली साहेब , मुंडेजी हारमोनियम वादन , गोड गल्याची गायिका पूजा मिस्त्री , नेहा , तसेच अगणित श्रोत्यानी ह्या मेहफिलीचा आनंद घेतला. सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेन्द्र म्हात्रे सर, रोहित जी पाटिल, रामनाथ गावंड, जयवंती गावंड , राम पाटील जनार्दन गावंड, महादेव गावंड , कौसल्या गावंड संगीता भोईर , रघुवीर भोईर , प्रेमा पाटिल , मीना पाटिल असे असंख्य श्रोता वर्ग उपस्थित होता.



Be First to Comment