सिटी बेल लाइव्ह / मुरूड / अमूलकुमार जैन 🔶🔷🔷🔶
“गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”,”पायी हळू हळू चाला,मुखाने हरीनाम बोला”अशा जयघोषात मुरूड शहरासहीत तालुक्यातील गावपाड्यांमध्ये पाच दिवसाचे गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.तर कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रकोप पाहता विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी सोशल डिस्टन्सिंग व कायदा सुव्यवस्थेचे पालन करुन कोरोनापासून सर्वांची लवकरच सुटका कर.अशाप्रकारचे साकडे विसर्जनाच्या वेळी भक्तांनी श्रीगणेशाला घातले.
गणेशोत्सवास प्रारंभ होण्यापूर्वी दोन तीन दिवसापूर्वीच पावसाने मुसळधार स्वरूपात बरसायला सुरूवात केली होती.तर गणेश चतुर्थीच्या दिवशीही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसतच राहिल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला.मुसळधार पाऊस व कोरोना महिमारीचा वाढत चाललेला प्रकोप या पार्श्वभूमीवरही गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता.
मुरूड शहरासहीत तालुक्यातील विविध गावातील घराघरात मोठ्या संख्येने गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली. तर पाच दिवसाचे गणपतींचीही संख्या मोठी असल्याने विसर्जनाच्या वेळी रस्त्यावय व विसर्जनाच्या ठिकाणी फार मोठी गणेश भक्त व भगिनींची गर्दी दिसून येत होती.विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नगरपंचायतीच्यावतीने निर्माल्य टाकण्याकरीता निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते तसेच पाण्यात खोल जावु नये त्याकरीता नगरपंचायतीच्या वतीने सेवक उभे करण्यात आले होते.
Be First to Comment