Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार

सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) :

कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाली. सदर विषय पत्रिकेवर असलेल्या 34 विषयांवर चर्चा करण्यात आली शासनाच्या सूचनेनुसार कर्जत नगरपरिषद श्री गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार असल्याचे सभेमध्ये ठरवण्यात आले.

शासकीय आदेशानुसार तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत नगरपरिषद ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, शरद लाड, विवेक दांडेकर, प्राची डेरवणकर, नितीन सावंत, संचिता पाटील, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, वैशाली मोरे, उमेश गायकवाड, धनंजय दुर्गे, संकेत भासे यांनी चर्चेत भाग घेतला.

बांधकाम सभापती विवेक दांडेकर यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी विकास कामांसाठी निधी मिळणे बाबत वेळोवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील कर्जत विकास कामासाठी साडे सहा कोटीचा ठोक निधी कर्जत साठी मिळवून दिला त्याबद्दल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र थोरवे तसेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला.

वेळोवेळी खड्डे पडून खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करावी लागते असे रस्ते त्यामध्ये भिसेगाव श्रद्धा हॉटेल ते चार फाटा या रस्त्याचे अध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पाठपुरावा करून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एमएमआरडीएच्या माध्यमातून हा रस्ता होऊ शकतो ही बाब निदर्शनास आणून दिली मात्र या दोन्ही रस्त्यांना एकच नाव असल्याने एमएमआरडीए निधी खर्च करत नव्हते. श्रद्धा हॉटेल ते चार फाटा तसेच दहिवली जिजामाता गार्डन पासून तमनाथ कडे जाणारा रस्ता हे दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असून हे रस्ते नगरपरिषद क्षेत्रातून जातात, या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी कानाडोळा करत असते या रस्त्यावरील खड्डया बाबत नगरपरिषद प्रशासनास नागरिकांकडून जबाबदार धरले जाते. हे रस्ते नगर परिषद मध्ये वर्ग करून घेण्याबाबत या सभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला.
शासनाच्या निर्णय नुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गणेश उत्सवाच्या बाबत जनजागृती करणे तसेच सर्व गणेश भक्तांना श्री गणेश गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करणे याबाबत देखील या सभेमध्ये चर्चा झाली.

योग्य त्या जागा बघून गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची मंजुरी सभेत देण्यात आली. जास्त गर्दी होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जनाच्यावेळी नगरपरिषदेने काळजी घ्यावी असे आदेश संबंधित बकर्मचाऱ्यांना देण्यात आले.
विषय पत्रिकेवर असलेल्या विकास कामांना या सभेत मंजुरी देण्यात आली तसेच आयत्या वेळीच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.