Press "Enter" to skip to content

४० व्या लोहमार्ग परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत लोहमार्ग मुंबईची दिमाखदार कामगिरी ; जनरल चॅम्पियनशिपवर कोरले नाव !

दिनांक :२८/११/२०२६
मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील)

नागपूर : ४० व्या लोहमार्ग परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा नागपूर २०२६ मध्ये लोहमार्ग मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठेची जनरल चॅम्पियनशिप पटकावली. या विजयामुळे लोहमार्ग मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्स, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, कुस्ती, खो-खो, तायक्वांदो, ज्युदो आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विविध खेळांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावना दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली.

सदर स्पर्धेचे आयोजन लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक श्री. मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश कलासागर, लोहमार्ग मुंबई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विजेत्या खेळाडूंचे तसेच संघ व्यवस्थापकांचे विशेष सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेत लोहमार्ग मुंबई संघातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. नारायण पवार यांना ‘बेस्ट खेळाडू’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
या यशामध्ये खेळाडूंच्या मेहनतीसोबतच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत, सातत्यपूर्ण सराव, योग्य नियोजन आणि खेळाडूंना दिलेली प्रेरणा यामुळे संघातील खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास मोठे प्रोत्साहन मिळाले. खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि क्रीडा विभागातील सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे.

यावेळी लोहमार्ग मुंबई संघाचे संघ व्यवस्थापक पोलीस निरीक्षक श्री. शशांक कदम, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. नंदकिशोर वाघ, जिल्हा क्रीडा प्रमुख श्री. सिद्धाराम मंगानोर, परिक्षेत्रीय क्रीडा प्रमुख श्री. मिलिंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

या यशानंतर आता आगामी पोलीस क्रीडा स्पर्धा पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्यामध्ये लोहमार्ग परिक्षेत्राचा संघ सहभागी होणार आहे. नागपूर येथे मिळविलेल्या जनरल चॅम्पियनशिपच्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने संघ आगामी स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.
लोहमार्ग मुंबईच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व क्रीडा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.