
मुंबई (पी.डी.पाटील): मुंबई विद्यापीठाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील एक विभागीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत नागरिक शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, ताडदेव येथील टी.वाय.बी.कॉम.ची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुभाष कदम हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले.
गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय, कोनगाव, भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत समृद्धीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे, जिद्दीचे आणि मेहनतीचे दर्शन घडविले. तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार श्री किसन कथोरेसाहेब यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
समृद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. जयदीप मिराशी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राज अंकुश सोष्टे, क्रीडा समितीचे संयोजक डॉ. सचिन मुंगसे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देत असून, समृद्धीचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास प्राचार्य प्रा. डॉ. राज सोष्टे यांनी व्यक्त केला.



Be First to Comment