Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अखंड दातृत्व ! आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची भरीव देणगीआगरी समाजाच्या वारकरी परंपरेचे जतन करण्यात धर्मशाळांचे योगदान मोलाचे ! – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (हरेश साठे)

वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आळंदी येथे जीर्णोद्धार करण्यात येणाऱ्या आगरी समाज धर्मशाळेसाठी थोर दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल दोन कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर केली आहे. त्यांच्या या उदार योगदानामुळे आगरी समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याला मोठे बळ मिळणार असून, त्यांच्या दातृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथे आगरी समाज धर्मशाळेच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन ह.भ.प. गुरुवर्य शांतिब्रह्म मारोतीबाबा कुरेकर महाराज यांच्या हस्ते आणि राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार राजेश मोरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, धर्मशाळा आळंदी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी आणि आगरी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धर्मशाळेच्या पुनर्बांधणीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच या पवित्र कार्यासाठी दोन कोटी रुपयांची भरीव देणगी जाहीर करून आपल्या दातृत्वाचा परिचय दिला. आळंदी येथे येणाऱ्या आगरी समाजातील भाविकांना निवासासह आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, समाजबांधवांना एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने या धर्मशाळेची उभारणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, आगरी समाजाच्या वारकरी परंपरेचे जतन करण्यात धर्मशाळांचे योगदान मोलाचे आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणात असून, या समाजात वारकरी संप्रदायाची परंपराही तितक्याच श्रद्धेने जपली गेली आहे. आपल्या पूर्वजांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही अपार कष्ट घेतले. संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या वारकरी मंडळींनी केले आहे. आळंदी असो किंवा पंढरपूर, या दोन्ही तीर्थक्षेत्रांमधील धर्मशाळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या धर्मशाळेचे काम उशिरा का होईना, आज प्रत्यक्ष सुरू होत आहे, याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद आहे. हे काम पुढील तीन वर्षांच्या आत पूर्ण होईल, असा मला विश्वास आहे. या पवित्र आणि शुभकार्यासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! अशा भावना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या देणगीतून समाजाप्रती असलेली त्यांची आत्मीयता, धार्मिक-सांस्कृतिक परंपरांविषयीची आस्था आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या योगदानाचे आगरी समाजासह वारकरी संप्रदायातून स्वागत आणि कौतुक होत आहे.


More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.