Press "Enter" to skip to content

अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन भाजपचे ‘सेवा दूत अभियान’ १ ते २५ डिसेंबरदरम्यान अभियान; पनवेलमध्ये ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अभियानाच्या नियोजनासह प्रभावी अंमलबजावणीवर मंथन

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यासोबतच समाजातील सर्वसामान्य घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने देशभरात १ ते २५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘सेवा दूत अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे आणि अखंड जनसेवेच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प भाजप परिवाराने केला आहे.या अभियानाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून पनवेल येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या विभागीय कार्यशाळेला प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, सेवादूत अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार विक्रांत पाटील, कोकण विभाग संयोजक आमदार प्रमोद जठार, सहसंयोजक संजय वाघुले, अभियानाचे कोकण संयोजक हेमंत म्हात्रे, विभाग संवादक अभिजित पेडणेकर, यांच्यासह ठाणे आणि कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष, अल्पकालीन विस्तारक, व विधानसभा समन्वयक उपस्थित होते.
अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे, कार्यपद्धती, नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘सेवा दूत अभियान’ हे केवळ पक्षाचे संघटनात्मक अभियान नसून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची एक व्यापक जनसेवा मोहीम आहे. समाजातील वंचित, गरजू आणि विविध स्तरांतील नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देणे, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

या अभियानाच्या माध्यमातून भाजपचा सेवाभावी दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याबरोबरच पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्याचे कामही अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे हे अभियान जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी जोडले जाणारे महत्त्वपूर्ण अभियान ठरणार आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.