Press "Enter" to skip to content

तिहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला जेरबंद करणाऱ्या सुभाष पुजारी यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव


नवरात्रोत्सव बंदोबस्तादरम्यान दाखवली सतर्कता; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान

पनवेल, दि.२२ (वार्ताहर) : बुलढाणा जिल्ह्यातील खळबळजनक तिहेरी हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पनवेल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश आले. पुजारी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि शिताफीची दखल घेत पोलीस आयुक्तांनी त्यांचा गौरव केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सुद्धा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.