Press "Enter" to skip to content

दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला ग्राउंड मोफत देऊनही देखभालीसाठी अडीच कोटींचा प्रस्ताव !


शिवसेनेचे नगरसेवक तथा महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांचा महासभेत विरोध; जुन्या कंत्राटदारांकडूनच खर्च वसूल करण्याचा महापौर नितीन पाटील यांचा निर्णय

पनवेल, दि.२० (वार्ताहर) : पनवेलमधील अत्यंत मोक्याचे मैदान दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला मोफत देण्यात आले आहे. करारानुसार मैदानाची देखभाल, इतर खर्च आणि उत्पन्नाची कायदेशीर जबाबदारीही अकॅडमीवर असताना, पुन्हा नागरिकांच्या पैशातून मैदानाच्या देखभालीसाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे नगरसेवक तथा महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी सभागृहात आक्षेप नोंदवला.

मैदानाच्या देखभालीची जबाबदारी करारानुसार अकॅडमीवर असताना महापालिकेने पुन्हा नागरिकांच्या पैशातून खर्च का करावा, असा सवाल सोमण यांनी उपस्थित केला. कोणाच्या फायद्यासाठी पनवेलकरांची दिशाभूल केली जात आहे, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रस्तावाला विरोध केला.

सोमण यांच्या आक्षेपांची दखल घेत महापौर नितीन पाटील यांनी ठरावात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. मैदानाच्या देखभालीसाठीचा खर्च नागरिकांच्या पैशातून न करता, जुन्या कंत्राटदारांकडूनच ही रक्कम वसूल करून मैदानाची दुरुस्ती व देखभाल करून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.