Press "Enter" to skip to content

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे उरणच्या समालोचकांना विमानाने गोवा टूर !

उलवे, ता. २० : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे उरणच्या समालोचकांना विमानाने १७ ते १९ नोव्हेंबर अशी तीन दिवस गोवा टूर घडविण्यात आली. शिवसंकल्प समालोचक आणि उरण समालोचक असोसिएशनच्या सभासदांना गोवा दर्शन घडविण्यात आले. यात निवेदक, समालोचक, नृत्य दिग्दर्शक, इव्हेंट मॅनेजमेंट, लाईव्ह टेलिकास्ट, मिमिक्री कलाकार, गायक आणि महेंद्रशेठ घरत फॅन क्लब अशा ४० हून जणांच्या चमूने‌ गोवा टूरचा आनंद घेतला. बहुसंख्यांचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विशेष म्हणजे महेंद्रशेठ घरत यांना १९७५ मध्ये गव्हाण-कोपरच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकविणारे लक्ष्मण लोखंडे सर या ७८ वर्षांच्या शिक्षकांनी गोवा टूरचा मनमुराद आनंद घेतला.

यावेळी उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांचा गोव्याच्या आलिशान बंगल्यात महेंद्रशेठ घरत यांनी वाढदिवस साजरा केला. शिवमुद्रा अकॅडमीचे संस्थापक पपन पाटील यांनी सिने क्षेत्रातील आणि मुरब्बी राजकारणी मंडळींच्या हुबेहूब आवाजात वाढदिवसाला रंगत आणली. यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले. शिवसंकल्प समालोचकचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी गोवा टूरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. समालोचकांच्या संघटनेने महेंद्र शेठ घरत यांचे आभार मानले. दिलेला शब्द पाळणारे आणि वचनाला जागणारे नेते म्हणजेच महेंद्रशेठ घरत होय, अशा भावना समालोचकांनी व्यक्त केल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.